kusegav ग्रामदैवत श्री भानोबा देव असलेले कुसेगाव
श्री भानोबा प्रसन्न कुसेगाव ता-दौंड जिल्हा-पुणे लेखन-पत्रकार अक्षय देवडे (दैनिक पुढारी) abdevade@gmail.com संकल्पना-कुसेगाव ग्रामस्थ कुसेगाव भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या महाराष्ट्र-राज्यातील पुणे जिल्ह्यात येणाऱ्या दौंड तालुक्यातील कुसेगावने ७०० वर्षांपूर्वीचा इतिहास नाव कोरले आहे.या गावची यात्रा राज्य नाव लौकिक प्रसिद्ध आहे असे ग्रामदैवत श्री भानोबा देवाची यात्रा असणारे डोंगराच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सौंदर्यात निर्माण झालेले आदर्श कुसेगाव असे हे छोटेसे गाव.. पावसाळ्यात डोंगराळ भागातुन निर्माण होणाऱ्या ओढ्या नाल्यातील किनाऱ्यावर निसर्गरम्य वातावरणाच्या सौंदर्यात बसलेले कुसेगाव आहे. गावाच्या वैभवात ग्रामदैवत श्री भानोबा देवाची तीन मंदिरे गावात असून तिन्ही ही मंदिरे गावाच्या वैभवात गावाला सौंदर्यदृष्टी निर्माण करून देत आहेत.. डोंगराच्या कुशीत बसलेले कुसेगावचे पडवी हद्दीतून टिपलेले छायाचित्र गावचे ग्रामदैवत श्री भानोबा देवाची यात्रा डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी असते.. सद्य परिस्थिती गावाला वरदान ठरणारा अष्टविनायक महामार्ग गावातून दोन ठिकाणाहून ...