kusegav ग्रामदैवत श्री भानोबा देव असलेले कुसेगाव

श्री भानोबा प्रसन्न




कुसेगाव ता-दौंड जिल्हा-पुणे

लेखन-पत्रकार अक्षय देवडे (दैनिक पुढारी)
abdevade@gmail.com
संकल्पना-कुसेगाव ग्रामस्थ

कुसेगाव 

भारताची आर्थिक राजधानी असणाऱ्या महाराष्ट्र-राज्यातील  पुणे जिल्ह्यात येणाऱ्या दौंड तालुक्यातील कुसेगावने ७०० वर्षांपूर्वीचा इतिहास नाव कोरले आहे.या गावची यात्रा राज्य नाव लौकिक प्रसिद्ध आहे असे ग्रामदैवत श्री भानोबा देवाची यात्रा असणारे डोंगराच्या कुशीमध्ये निसर्गाच्या सौंदर्यात निर्माण झालेले आदर्श कुसेगाव असे हे छोटेसे गाव..

पावसाळ्यात डोंगराळ भागातुन निर्माण होणाऱ्या ओढ्या नाल्यातील किनाऱ्यावर  निसर्गरम्य वातावरणाच्या सौंदर्यात बसलेले कुसेगाव आहे. गावाच्या वैभवात ग्रामदैवत श्री भानोबा देवाची तीन मंदिरे गावात असून तिन्ही ही मंदिरे गावाच्या वैभवात गावाला सौंदर्यदृष्टी निर्माण करून देत आहेत..

डोंगराच्गाया कुशीत बसलेले कुसेगावाचे चित्र
डोंगराच्या कुशीत बसलेले कुसेगावचे पडवी हद्दीतून टिपलेले छायाचित्र

गावचे ग्रामदैवत श्री भानोबा देवाची यात्रा डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी असते..



सद्य परिस्थिती गावाला वरदान ठरणारा अष्टविनायक महामार्ग गावातून दोन ठिकाणाहून गेल्याने या दोन्ही ही महामार्गावर ग्रामदैवत श्री भानोबा देवाची मंदिरे आहे...

पडवी गावमार्गे रस्त्यावरून दिसणारे श्री भानोबा देवाचे पाहिले मंदिर 

कुसेगाव पडवी म्हणले गेलेल्या पडवी गावामार्गे गेलेल्या अष्टविनायक महामार्गावर एक मंदिर आहे तर गावातून सुपे मार्गे गेलेल्या अष्टविनायक महामार्गावर ग्रामदैवत श्री भानोबा देवाची यात्रा भरते ते भव्यदिव्य असे गावाने निर्माण केलेले दुसरे मंदिर आहे..

गावाने लोकवर्गणीतून भव्यदिव्य असे गावाने निर्माण केलेले दुसरे मंदिर

तर श्री भानोबा देव मार्गस्थ होताना गावातील शेवटचा मुक्काम असणाऱ्या भोसलेवाडी या ठिकाणी तिसरे मंदिर आहे..या तीन हि मंदिरांना श्री भानोबा देवाचा वेगवेगळा इतिहास आहे..


पाटस येथून कुसेगावला जाताना पडवीगावा मार्गे गेलेल्या अष्टविनायक महामार्गावर गावतील मुख्य चौकात विठ्ठलाचे मंदिर आहे त्याला खेटूनच उजव्या दिशेला हनुमानाचे मंदिर आहे याच चौकात श्री भानोबा देवाचे आगमन होतात मोठ्या जलोष्यात भानोबाचा गजे नाचत तर महिला वर्ग देवाचे पूजन करत स्वागत करत असतात..

गावातील मुख्य चौकात महिला वर्ग श्री भानोबा देवाचे पूजन करत स्वागत करत असतात..

त्याच्या पुढे असणाऱ्या दत्त मंदिरापासून उजव्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भोसलेवाडी या ठिकाणी श्री भानोबा देवाचे मंदिर आहे व दत्त मंदिराच्या डाव्या दिशेला पाहिल्यास श्री भानोबा देवाचे पारंपरिक व ऐतिहासिक महत्व असणारे महत्वाचे मंदिर आहे..

* गावाची लोकसंख्या आणि वार्ड रचना *

डोंगराच्या निसर्गाच्या सानिध्यात बसलेले छोट्याश्या कुसेगावची लोकसंख्या 3 हजाराच्या संख्येत आहे तर ग्रामपंचायतची बलाबल 9 इतकी आहे यामुळे गावात तीन वार्ड आहेत.

श्री भानोबा देवाचे पारंपरिक व ऐतिहासिक महत्व असणारे महत्वाचे मंदिररात देवाचे आगमन होत असताना जमलेले भक्त 

महिला सरपंचाच्या काळात गावच्या लोकवर्गणीतून श्री भानोबा देवाचे भव्यदिव्य असे मंदिराचे कामकाज सुरु झाले आहे.. 

* उत्पनाचा स्रोत  *

निसर्गाच्या वरदाना डोंगरांमध्ये जिरायती पट्यात बसलेले आणि भानोबा देवाचा आशीर्वाद असलेले कुसेगाव गावचा काही भाग बारमाही बागायती तर काही भाग आठ माही बागायती क्षेत्र असल्याने काहींची आर्थिक परस्थितीचांगलीतर काहींची खालावलेली असतानाही हसत खेळत हे गाव एकमेकांच्या सुख दुःखात असल्यासारखे वाटून घेत असणारे हे कुसेगाव आहे गावाला उत्पनाचा स्रोत काहीच नसल्याने  हे गाव जिरायती भागात असल्याने पावसाच्या पाण्यावरती तलाव व ओढ्याला आठ माही पाणी असते यातून गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे प्रमुख पीक ऊस घेतले जाते...

कमी खर्चात व कमी पाण्यावर येणारे गावातील बाजरीचे पीक

पावसाळ्यात बाजरीचे पीक अनेक जण घेत असतात सध्या गावातील अनेक शेतकरी डाळिंबाच्या  फळ बागा ठिबक सिंचन द्यारे जगवताना दिसत आहे  आणि मागील चार वर्षांपासून कांदा पिकाची लागवड करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे यामुळे गावातील बरेचशे क्षेत्र बागायती झाल्याने नागरिकांना चांगले उत्पादन मिळते .शेतील  जोड धंदा म्हणून अनेक लोक दूध हा व्यवसाय करीत आहेत. कुरकुंभ औद्योगिक वसाहत काही अंतरावरच असल्याने गावातील अनेक तरुणवर्ग मागील पाच वर्षांपासून नोकरीसाठी या ठिकाणी जात आहे..तर गावातील काही नागरिकांचे पाटस येथे छोटे मोठे उद्योग व्यवसाय आहेत..

अष्टविनायक महामार्ग गावातूनच गेल्याने येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात उत्पनाचा स्रोत उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तर काहींनी या दिशेने वाटचाल केली सुद्धा आहे..

कुसेगावाला जाण्यासाठी पुणे सोलापूर हायवे,अष्टविनायक महामार्ग,सातारा शिरूर महामार्ग,चा वापर होतो..

दौंड तालुक्याला लाभलेला पुणे-सोलापूर राष्ट्रीय राज्य महामार्गवरील पाटस येथून अष्टविनायक महामार्गाचा वापर करून भीमा पाटस सहकारी साखर करखान्यावरून  ४ किमी अंतरावर कुसेगावला जात येत.कुसेगाव पाटस सीमेवरती ग्रामदैवत भानोबा देवाच्या नावाचे असणारे भानोबा विद्यालयाच्या समोरून गावचे नैसर्गिक दृश्य डोळ्यांनी टिपता येत आहे येथे दोन किमी अंतरावर  गाव आहे ..

तर शिरूर-सातारा राज्य महामार्गाने सुपा ते चौफुला या दरम्यान असणाऱ्या  देऊळगावगाडा फाटा येथून ४ किमी अंतरावरून अष्टविनायक मार्गाचा वापर पडवी गावातून पुढे येत असताना वनविभाग क्षेत्र दिसत चिंकारा हरणारचे दृष्य डोळ्यांनी टिपता येत तर पावसाळ्यात हिरवागार सजलेला डोंगर पाहण्यात मिळतात  हे दृश्य पाहता क्षणी पुढे गावाती नैसर्गिक दृश्य व भानोबा देवाची दोन्ही मंदिरे पाहता येतात येथून १ किमी अंतरावरच कुसेगाव असताना गावचे दृश्य पाहताना कधी गाव आले हे समजत नाही.


कुसेगावच्या दक्षिणेला मयुरेश्वर अभयारण्य काही भाग लाभला असल्याने बारामती तालुक्याची हद्द लागून आहे यामुळे येथेन सुपा येथे जात पुढे मोरगाव  सासवड बारामतीला जात येत आहे..

गावातून अष्टविनायक महामार्ग गेला असल्याने गावाला खूप महत्व आले असल्याने पाटस वरून पुणे सोलापूर शहरात जात येते.. पुढे हा अष्टविनायक महामार्ग दौंड शहरातून सिद्धटेक येथे जात आहे.. 

बारामती तालुक्यातील ऐतिहासिक दृष्ट्या इतिहासात महत्व असणारया सुपा व कुसेगावची शिव आहे सुपा येथून कुसेगावला जाण्यासाठी मयुरेश्वर अभयारण्यात गेलेल्या अष्टविनायक मार्गने प्रवास करताना मयुरेश्वर अभयारण्यात आल्यावर मोठ्या प्रमाणात चिंकारा हरणे दिसतात विविध पक्षी प्राणी ही पाहवयास मिळत आहेत अनेक तरुण वर्ग याठिकाणी फोटो सूट करण्यासाठी येत आहेत या ठिकानाहुन कुसेगावची हद्द सुरू होतात पुढे पाटस गावातील विविध ठिकाणची दृश्य डोळ्यांनी टिपता येत आहे तसेच हे ठिकाण उंचावर असल्यामुळे कुसेगावची व दक्षिण दिशेकडे अनेक दृश्य पाहवयास मिळत असल्यामुळे या गावाला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले असल्याचे दिसून येत आहे..


-----गावाच्या नावाचा इतिहास .------गावातील आडनाव  शितोळे,भोसले फडतरे,गायकवाड,सोनवणे कोळेकर,रुपणवर,चव्हाण,चोरमले,खोमणे,खंडाळे कोकाटे,मोरे अश्या आडनावाची विविध जाती धर्माची लोक आनंदाने एकत्र कुटुंब असल्यासारखी  राहतात.

कुसेगाव दक्षिण उत्तर दिशेला पसरलेले असून गावाला पूर्वेला रुपणवर वस्ती,वाघदार मळा,पश्चिमेला भोसलेवस्ती - दक्षिणेला चव्हाण वस्ती,लागत शितोळे वस्ती अश्या स्वरूपाच्या वाड्या -वस्त्या आहेत...

पूर्वी गावात वाद जरी झाला तरी तो गावातील कट्ट्यावर  बसून गावातील जेष्ठ व प्रतिष्ठित व्यक्ती मिटवत व त्यांचा शब्द अंतिम मनाला जात पाळला जात होता श्री भानोबा देवाच्या यात्रेच्या वेळी १५ दिवस गावातील सर्व जण एकत्र येऊन यात्रा उसत्व एकत्र येत मोठ्या जलोष्यात साजरा केले जात असतो.

कुसेगाव गावाची वाट चाल नगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिरवे बाजार व राळेगणसिद्धी असे गाव बनवण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे ग्रामस्थ बोलू लागले आहे....


*गावाचा झालेला विकास*

१)गावचे ग्रामदैवत भानोबा देवाला तीर्थक्षेत्र क्षेत्राचा क दर्जा मिळाला  २)गावातील सिमेंट काँक्रीट रस्ते   ३)नळ पाणी पुरवठा  ४)गावात वृक्ष लागवड  ५)हायटेक ग्रामपंचायत  ६)धार्मिक मंदिरांचा विकास ७)पथदिवे  8)जेष्ठ नागरीक यांना बसण्यासाठी बेंच 

*सोबत-फोटो*

१) ग्रामदैवत - श्री भानोबा देवाचे  मंदिरे 

२) गावातील ग्रामपंचायत

३) गावचे चित्र 

  ४) विजयवाडी तलाव.. 


५)गावातील- भोसलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा 


श्री भानोबा विद्यालय 


Comments